मी आणि गाढवं - ३

कोल्हापुराला निवड झाली असा कमलेशचा मेसेज आला. रविवारी संध्याकाळी तो घरी भेटायला आला.

काय रे कधी चाललाय कोल्हापुराला?

-वेळ आहे अजून, एक-दीड महिना तरी लागेल.

तू तर निवड झाली म्हणून SMS पाठवला होता.

- तसं confirm आहे. पण कॉल लेटर आल्यावर join होणार. आणि कॉल लेटरला एक-दीड महिना तरी लागेल.

कोल्हापूर म्हणजे बरंच लांब होतंय. जवळपास बघायचं ना.

-तसं ठाण्याला पण जागा आहेत. भिवंडीला पण आहेत. आणि पुण्याला कालच जाऊन आलोय.

मग ठाणे किंवा भिवंडी जवळ पडेल तिकडे try कर, कोल्हापुराला कशाला चाललाय.

- अरे interview देऊन ठेवतो, कधी काय होईल ते माहीत नाही.

का?

-भिवंडीला आणि कोल्हापुराला stay आणलाय.

भिवंडीला stay? कशासाठी?

- तिकडे त्यांना मुसलमान लोकांची भरती करायची. 

अरे पण असा stay कसा आणता येईल. शक्य नाही.

- सगळं possible आहे. जाम लफडी असतात रे, सगळं पॉलिटिक्स आहे.

नाही असा stay शक्य नाही, कोर्टात अशी केस उभी राहूच शकत नाही.

- एकदा कोर्टात गेलं की त्याला २-३ वर्षे लागतील, मग आम्ही लटकलो ना, म्हणून मी सगळीकडे interview देऊन येतोय.

 आणि कोल्हापुराला काय झालं?

- तिकडेपण नगरसेवकाने असाच stay आणलाय.

म्हणजे?

- स्थानिक लोकांना भरती करायचं म्हणून.

हां बरोबर आहे त्यांचं. अरे म्हणजे भिवंडीलापण असाच stay असला पाहिजे.

- हो पण तिकडे स्थानिक म्हणजे सगळे मुसलमानच ना.

पण तू ज्यापध्दतीने सांगितलं त्यामुळे काही भलताच अर्थ निघतो ना. मला वाटलं फक्त मुसलमान लोकांना घ्यायचंय म्हणून stay order आणलीय.

- अरे पण ते understood आहे ना. तिकडे स्थानिक काय अन मुसलमान काय एकच.

मला माझ्या वैचारिक मागासलेपणाची कीव आली.