गाढव आणि अर्थशास्त्र - १
शिक्षण झाल्यानंतर नोकरी करावी या हेतूने कॉम्प्युटर क्लास लावला. जॉब गॅरंटी देणारा एक महागडा क्लास मित्राच्या मदतीने शोधला, पैसे भरले. क्लास सुरू झाला, संपला. नोकरी मिळाली. नंतर क्लासचा आणि माझा संबंध संपला. पुढे माझ्या गुणवत्तेच्या(?) जोरावर पुढे आलो. नव्या नोकऱ्या, चांगल्या कंपन्या, चांगला पगार सारं सहज जमत गेलं.
आज मी भोवतालाची माणसं बघतो तेंव्हा काहीतरी चुकतंय अस वाटतं. कुठेतरी नक्की चूक होतेय.
बहुतेक सहकारी सधन कुटुंबातील आहेत. इथेच काहीतरी चूक होतेय. सारे सधन कुटुंबातील कसे असू शकतात?
गणित सोपं होत. माझ्या क्लासमधील विद्यार्थीदेखील सधन कुटुंबातील होते. महागडा क्लास लावण्याचे कारण म्हणजे, नोकरीची हमी आणि पुरेसा पैसा असणारे पालक.
बरं मी ज्या क्षेत्रात काम करतोय तिथे कर्मचाऱ्यांची मागणी जास्त तर पुरवठा कमी आहे. मोठ्या पगाराची नोकरी मिळाली की लगेच नोकरी सोडायची हे ठरलेलं. काम नसलं की कामगार कपात हे कंपन्यांचं ठरलेलं.
नवीन माणसं ओळखीद्वारे निवडली जातात. ओळखीचं कोणी नसेल तर www.jobs.com सारख्या साईट आहेतच मदतीला. बहुतेक ठीकांनी "नोकरीसाठी जाहीरात" हा शेवटचा पर्याय असतो.
बरेचदा असं दिसून येतं की नवीन माणूस अपेक्षेप्रमाणे काम करत नाही. बऱ्याचदा "ढ" म्हणावं अशी माणसे असतात. कामावरून कमी करण्यापेक्षा copy & paste प्रकारात मोडली जाणारी कामे त्याला दिली जातात.
बहुतेक ठिकाणी अशीच माणसे जास्त असतात. दोन-चार हुशार/कुशल कर्मचाऱ्यांना मनासारखा पगार देऊन त्यांच्या हाताखाली अशी copy & paste करणाऱ्यांची टीम असते. स्वस्तात काम होतं. स्वस्तात म्हणजे इतर कर्मचाऱ्यांच्या मानाने कमी परंतू उच्च मध्यमवर्ग म्हणतात एव्हढा.
BE/MCA अशा उच्चशिक्षितांप्रमाणेच अनुभवी/कुशल कर्मचाऱ्याला मान दिला जातो. पैसाही. एकदा कामावर आला की या पदव्यांचा उपयोग शून्य असतो. तिथे तुमच्या पदवीपेक्षा तुम्ही काम कसं करता याला महत्त्व दिले जाते. माझ्या माहितीतले बरेचसे BE/MCA "ढ" वर्गातले आहेत त्यांचा उपयोग copy & paste साठीच केला जातो.
इथे मला गणित उमगलं.
पैसेवाले पालक = महागडा क्लास = नोकरीची हमी = चांगला पगार
पुढे लग्नदेखील नोकरी पाहून केले जाते. म्हणजे नोकरी करणारी मुलगीच पाहीजे. आणि परत,
पैसेवाले पालक = महागडा क्लास = नोकरीची हमी = चांगला पगार

मस्त लिहीलेय! आवडल॑ मला!
Comment by म॑गेश — July 30, 2007, 11:28 pm @ 11:28 pm