बॉम्बस्फोट आणि गाढव

आज दिनांक १२/०७/२००६. सकाळी गाढवाप्रमाणे उठलो. गाढवलेली कामे केली. TVवर मस्तपैकी कालच्या बॉम्बस्फोटाची चित्रे पाहिली. पोलीस, अतिरेकी, सोनिया, लालू, देशमुख, काँग्रेस, मुस्लिम आणि माहीत असलेल्या सर्वांना मनसोक्त गाढव शिव्या दिल्या.

८.२४ ची लोकल पकडली आणि ग्रुपमधील सगळ्यांनी मिळून शिव्या देण्याचा कार्यक्रम पार पाडला. भिवंडी, काश्मीर, ISI, सिमी अशा बहुतेकांचे संबंध बॉम्बस्फोटाशी जोडले.

गाड्या स्लो असल्यामुळे उशीर झाला. लेटमार्क लागलाच आहे तर इराण्याच्या हॉटेलमध्ये मस्का पाव-चहा घेतला, दोघांनी खिमा-पाव घेतल्यामुळे थोडा तिकडेपण हात मारावा लागला.
ऑफिसमध्ये मेल चेक केल्यावर वेगवेगळ्या ब्लॉग आणि फोरम मध्ये शिव्या देण्याचा कार्यक्रम पार पाडला. चहा नंतर कामाला सुरुवात करणार केली. आता बहुतेक LUNCH मध्ये आणि संध्याकाळी लोकलमध्ये शिव्या देण्याचा कार्यक्रम करणार.

या भडव्यांना अद्दल घडवलीच पाहिजे.

हिरवे साप फार चेकाळलेत, बघूया भगवे बेडूक किती उड्या मारतात.
च्याआयला बंद नको नाहीतर रविवारी कामावर यावे लागेल.