गाढवप्रश्न - १

या गाढव समाजात वावरताना मला बरेचदा काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.

आपण का जगतो? इतर प्राणी, झाडे, पक्षी का जगतात?
बरे फक्त जगतच नाही तर नवीन जीवांना जन्मदेखील देतो.
इतरांच ठीक आहे निसर्गानं आखून दिलेल्या रस्त्याने जायचं, जगायचं - मरायचं.

आपण मात्र संस्कृतीच्या नावाखाली स्वतःला नको तो त्रास देत असतो. उगाचच सु-संस्कृत असल्याचा दिखावा करतो.
नर-मादी हे साध सरळ नात सोडून आपण नवी नाती तयार केली. त्यांच्या जंजाळात अडकलो. कशासाठी?

योग्य त्या वयात प्रणयक्रिडा करणे आपण सोडून दिले. आता तर लग्नाचे वय विनाकारण वाढवले. कशासाठी?
तर बदललेली संस्कृती.. मग आपल्या भावनांना इतर मार्गाने वाट करून द्यायची. मैथुनासारखे प्रकार त्यातलेच.

कशासाठी हे सगळं?

बरं विवाहपूर्व संबंधांना तथाकथित संस्कृती रक्षकांचा विरोध. का?
जर शारीरिक गरजा योग्य त्या वेळेस दोघांच्या अनुमतीने भागवल्या तर हरकत कशाला?
१८-२१ वर्षावरील मुलं जर लग्नाचे निर्णय घेऊ शकतात तर विवाहपूर्व संबंधांना कायदेशीर मान्यता का नको?.

संस्कृतीच्या नावाखाली निसर्गाशी वैर कशाला?

2 Comments »

The URI to TrackBack this entry is: http://gadhav.blogsome.com/2006/07/10/p10/trackback/

  1. aapna mnusa aahota mga manasa sarakhe jagayala nko ka ?

    Comment by omprakashdanve — August 23, 2006, 7:44 pm @ 7:44 pm

  2. अगदी पटले! रस्त्यावरुन जाताना जाणवते की लैगीक सुखाच्या बाबतीत आपल्यापेक्षा कुत्री, गाढवं सुध्धा खूप सुखी आहेत. स्वत:वर खुळचट बंधने लादून माणसाने काय साधले? आजकाल बहूतेक तरुणांच्या डोक्यात सेक्स कसा मिळेल ह्यावरच जास्त विचार चालू असतात. आणि ते बरोबरही आहे. सेक्स ही निसर्गाने निर्मिलेली मुलभूत शारीरीक भूक आहे. ती एक गरज आहे. तहान, भूक लागते तशीच. ती भूक वेळेतच जर शमली नाही तर इतर गोष्टींमध्ये मन रस घेईल का? कडकडून भूक लागलेली असताना अभ्यासात लक्ष लागेल का? उपाशी पोटी राहून कर्तृत्ववान होता येईल का? पुर्वीच्या काळी पराक्रमी राजांच्या अनेक राण्या असत. त्या काय त्यानी नुसते जेवण करून वाढायला ठेवल्या होत्या काय? ह्यावरून काय सिध्द होते? शारीरीक भूकेवर अशी बंधने लादून दांभिक संस्कृती निर्मात्यानी काय साधले?

    Comment by Ashish — July 26, 2007, 4:58 pm @ 4:58 pm

RSS feed for comments on this post.

Leave a comment

Line and paragraph breaks automatic, e-mail address never displayed, HTML allowed: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <code> <em> <i> <strike> <strong>



Anti-spam measure: please retype the above text into the box provided.