आज्जा

माझ्या आज्ज्याला मी नोकरीला जाण्याचा भारी अभिमान होता.
आमच्या पूर्णं खानदानात १५वी शिकलेला मी एकटाच होतो, त्यात नोकरी म्हणजे "सोनेपे सुहागा".
त्याच्या मित्र मंडळीत तो हि गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगायचा.

पण मी कामाला जातो आणि तिथे काम काय करतो हि गोष्ट त्याला शेवटपर्यंत समजली नाही.
मी बऱ्याच वेळा माझ्या परीने प्रयत्न केला पण त्याला काही समजले नाही.
दर दोन-चार आठवड्याने मला माझ्या नोकरीबद्दल प्रश्न विचारायचा.

काम कसं चाललंय?
- चांगलं चाललंय.
अंग मेहनतीच काम असतंय का?
- नाही. बसून असतो दिवसभर. सकाळी खुर्चीवर बसलं की संध्याकाळीच उठायचं.
पाठ दुखतं असलं नाय का?
- हा. होतो त्रास.
मग मधी-मधी उभं ऱ्हायचं. भायेर फिरून यायचं. भायेर जाउ देत्यात का?
- हो.
मोठं-मोठ्या मशनी हायेत का?
- नाय.
मग लीखापढीचं काम हाय का?
- नाय.
मग?
- कॉम्पुटरचं काम आहे.
म्हंजे?

आता संगणक म्हणजे काय? तो कसा असतो? आणि काम कसे केले जाते हे मला कधीच समजावून सांगता आले नाही. तरीही मी माझ्या परीने प्रयत्न करायचो. आज्ज्याला टाईपरायटर माहीत होता. बहुतेक कोर्ट-कचेरीमध्ये बघितला असावा.

- टायपिंग करतात ना तशी मशीन असते. 
लय टाइप करावं लागतं का? बोटं दुखतं आसतील ना?
- नाय. जास्त टाइप करावं नाय लागत.
मोठी कंपनी हाय का?
- नाही. लहान आहे. १०-१५ माणसं आहेत.
आन माल वाहून न्यायला येगळी माणसं असत्यात का?
- नाही माल-बील काही तयार होत नाही आमच्या कंपनीत.
मग कंपनी करती काय? (उत्पादन कशाच होत?)
- आम्ही कॉम्पुटरवर काम करतो आणि कॉम्पुटरवरच पाठवतो. नाहीतर CD बनवून पाठवतो.

Upload - download करायचं म्हणजे काय? त्या भानगडीत मी पडत नसे. CD म्हणजे जुन्या ग्रामोफोनच्या तबकड्या. समजायला सोप्या होत्या.

त्याच्यात गाणी असत्यात का?
- नाय. त्याच्यात आम्ही केलेलं काम असत.
दररोज माल जातो का?
- नाही काम झालं की जातो.

अस काही ठरावीक दिवसांच्या अंतराने आमचं संभाषण चाले.
कंपनी म्हटलं की एखादा कारखाना ज्यात काहीतरी उत्पादन होत, जे एखादा ट्रक किंवा तत्सम वाहनाने इच्छित स्थळी पोहचवले जाते असा समज असलेल्या माझ्या आज्ज्याला मी काम काय करतो हे शेवटपर्यंत कळले नाही.

4 Comments »

The URI to TrackBack this entry is: http://gadhav.blogsome.com/2006/07/07/p9/trackback/

  1. sahi lihile aahe

    Comment by dhimate — July 7, 2006, 12:04 pm @ 12:04 pm

  2. naav kaay buvaa tumachM?
    paN agadii mast lihitaa raav.. aavarjuun vaachato mii.. aajjyaachii goShT mastach… Hrishikesh Mukherji Cinema pahilyaasarakhM vaaTatM…

    Comment by giri — July 7, 2006, 12:29 pm @ 12:29 pm

  3. feed back milato kaa ho tumhalaa ? mii don feedback dilet paN post jhaale naahiit.. kahitari karaa

    Comment by giri — July 7, 2006, 12:40 pm @ 12:40 pm

  4. फ़ीडबॅक ला काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय… type केलेलं दिसत नाही.
    continue your writing… its nice… u’ve got 1 permanent reader :)

    Comment by dhimate — July 7, 2006, 3:27 pm @ 3:27 pm

RSS feed for comments on this post.

Leave a comment

Line and paragraph breaks automatic, e-mail address never displayed, HTML allowed: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <code> <em> <i> <strike> <strong>



Anti-spam measure: please retype the above text into the box provided.