मानसशास्त्र - १
झोपडपट्टीतल्या गल्लीत शेवटच्या टोकाला आमचे घर, समोर गुप्ता आणि दोन-चार घरे सोडल्यावर बांगडीवाल्याचे घर.
बांगडीवाल्याने नवीन "टेप रेकॉर्डर" घेतला होता.
मिळेल त्या वेळेस नव्या-जुन्या हिंदी गाण्याचा आस्वाद त्याचे घर घेत होते.
आजू-बाजूच्या २०-२५ घरांना पुरेल एव्हढ्या किंवा शक्य तेव्हढ्या मोठ्या आवाजात तो हजार - दीड हजाराचा टेप जीव ओतून गाणी गात असे.
बऱ्याचदा त्या मोठ्या आवाजाचा त्रास व्हायचा.
बांगडीवाल्याची मुलगी सलमा.
तिला आवाज कमी करण्याची विनंती करावी लागे.
खरे नाव सलिमुन्नीसा.
एकदा बाहेर तिच्याशी गप्पा मारत होतो.
सहजच "टेप रेकॉर्डर" विषय निघाला.
गुप्तांच्या घराकडे पाहून म्हणाली,
"बहोत कंजूष है ये लोग, १०-१२ हजार का टेप लिया है लेकीन इतना बारीक आवाज करके सुनते है की किसीको सुनाई न दे.
अब आवाज बढाने से इनका क्या जायेगा?
सिर्फ घरवाले लोग सुनते है, इतना बिजली बचाके बिल तो उतनाही आता है ना.
अभी जीसके पास टेप नही वो क्या करेगा?
हम लोग देखा ना कैसा फूल आवाज मे गाना सुनते है.
हम भी सुनते है और सबको सुनाते है."
मला गुप्ताच्या कंजूषपणाचा जाम राग आला.

sahi aahe
Comment by dhimate — July 7, 2006, 12:02 pm @ 12:02 pm
यात पण मज्जा आहे बुवा!!
Comment by म॑गेश — July 30, 2007, 11:40 pm @ 11:40 pm