मी आणि गाढवं - २
माझ्या अज्ञानाचा फायदा घेत राहुलने मला इतिहासाचे धडे देण्याचा प्रयत्न केला.
"हिंदू धर्मात मंदिर बांधण्याची प्रथा नव्हतीच मूळी. बौद्ध आणि जैन धर्माच्या अस्तानंतर ही प्रथा सुरू झाली. अत्यंत अमानुषपणे त्यांच्या कत्तली करण्यात आल्या त्यांची प्राथनास्थळे पाडून तिथे मंदिरे बांधण्यात आली. जिथे "पाडण्यासारखी" गोष्ट शक्य नव्हती तिथे सरळसरळ हिंदू देवतांची स्थापना केली गेली. लेणी, गुंफा बघ. बौद्ध लेण्यात हिंदू देवता सुखाने नांदताना दिसतात."
"पुढे मुसलमान आले. त्यांनी मंदिरे पाडून मशीदी बांधल्या. हे होणारच होते त्यावेळेस राजेशाही होती ‘बळी तो कान पिळी’ या न्यायाने जग चालते.
पण आता काय? लोकशाहीत आपण मशीदी पाडतोय,
बाबरी पाडली……मंदिर होतं म्हणून….पाडूद्या.
ताजमहालही पाडू…..
आणि कोणी म्हणालं, मंदिराखाली बौद्ध, जैन किंवा द्रविड मंदिर होत तर…… तर काय करणार?
ते जाऊदे… ज्या बौद्ध, जैन लेण्यामध्ये मंदिरं आहेत, जिथं काही उकरायची गरज नाही, त्याचं काय?"
माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहुल विजयी मुद्रेने निघून गेला.
